या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; अवघ्या सात महिन्यांमध्ये पैसे दुप्पट

 

या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; अवघ्या सात महिन्यांमध्ये पैसे दुप्पट


Share Market | सलग दोन तिमाहींमध्ये कंपनीने नफा कमावला आहे. याशिवाय, सध्याच्या घडीला कंपनीच्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही. त्यामुळे आगामी काळातही KPIT Technologies Ltd च्या समभागाचा भाव आणखी वधारेल, असा अंदाज आहे.


सध्या शेअर बाजारात केपीआयटी टेक्नोलॉजी लिमिटेडच्या(HGS) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात KPIT Technologies Ltd. कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 300 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. एवढेच नव्हे तर या मिडकॅप समभागाने अवघ्या सात महिन्यांत गुंतवणुकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. गेल्यावर्षी याचा काळात केपीआय टेक्नोलॉजी कंपनीच्या समभागाचा भाव 78.40 रुपये इतका होता. मात्र, सध्या या समभागाची किंमत 332.70 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.

याचा अर्थ गेल्या वर्षभरात या समभागाने जवळपास 325 टक्के रिटर्न्स दिले आहेत. गेल्या तीन महिन्यांत केपीआयटी टेक्नोलॉजीच्या समभागाचा भाव 59 टक्क्यांनी वधारला आहे. तर शुक्रवारी या कंपनीच्या समभागाने 332.70 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकाला गवसणी घातली. त्यामुळे या कंपनीचे भांडवली बाजारातील एकूण मूल्य 9,061.82 कोटींवर पोहोचले आहे.

Post a Comment

और नया पुराने