तेजीला ब्रेक ; नफावसुलीने सेन्सेक्स घसरला, निफ्टीवर दबाव.
विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. आज मंगळवारी बाजार सुरु होताच सेन्सेक्स ११८ अंकांनी घसरला आणि ५५४६४ अंकापर्यंत खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३० अंकांनी घसरला आणि १६५३२ अंकापर्यंत खाली आला.
यापूर्वी सलग सहा सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली होती. मात्र आज आशियातील नकारात्मक संकेत, डेल्टा व्हेरिएंटचा वाढत प्रभाव याचा परिणाम भांडवली बाजारावर दिसून आला. दुसरीकडे अमेरिकन भांडवली बाजार उच्चांकी पातळीवर बंद झाले.
आजच्या सत्रात बँका, वित्त संस्था आणि काही ब्लुचिप शेअरवर दबाव दिसून आला. इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, मारुती या शेअरमध्ये घसरण झाली. तसेच ऍक्सिस बँक, एचडीएफसी, एल अँड टी , टेक महिंद्रा या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
सध्या सेन्सेक्स ५४ अंकांनी घसरला असून तो ५५५२७ अंकावर आहे. तर निफ्टी १६५५६ अंकावर असून त्यात ६ अंकांची घसरण झाली आहे. मागील काही सत्रात तेजीनंतर आता बाजार पुन्हा मूळपदाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्विसेसचे मुख्य गुंतवणूक अधिकारी व्ही. के. विजय कुमार यांनी सांगितले. निफ्टी १६७०० च्या दरम्यान राहील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
काल सोमवारी सेन्सेक्स १४५ अंकांनी वधारला होता. तर निफ्टीमध्ये ३३ अंकांची वाढ झाली होती. कालच्या सत्रात निफ्टीने ११६५८९ अंकांची विक्रमी पातळी गाठली होती.

एक टिप्पणी भेजें